‘भारतवीर’च्या ‘या’ देखाव्यामुळे निश्चितपणे कोल्हापूर जिल्ह्यात आमची मान उंचावणार : आ. ऋतुराज पाटील | पुढारी

'भारतवीर'च्या 'या' देखाव्यामुळे निश्चितपणे कोल्हापूर जिल्ह्यात आमची मान उंचावणार : आ. ऋतुराज पाटील

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा प्रत्येक वेळी भारतवीर मंडळ समाजाला एक वेगळा संदेश देण्याचे काम करते, यावर्षी ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ च्या माध्यमातून समाजाला विषेशतः तरुणांना सकारात्मक जीवनाचा संदेश या मंडळाने दिला आहे. या देखाव्यामुळे निश्चितपणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमची मान उंचावणार आहे, असे मत आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.भारतवीर मित्र मंडळाच्या समाजातील उपेक्षित घटक व दिव्यांग व्यक्तींना समर्पित ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ ? या सजीव देखाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. सोमवारी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

दिव्यांग नाहीत ते दिव्य आहेत हे समाजाने मान्य केले पाहिजे, असे मत सिने अभिनेता विराट मडके यांनी व्यक्त केले. यावेळी मडके यांनी केसरी या चित्रपटातील ‘लाल’ ही कविता सादर केली. उदघाटनप्रसंगी मधुरिमाराजे छत्रपती, डॉ. भुषण शेंडगे, डॉ. महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजाराम कारखान्याचे संचालक हरीष चौगुले, भारतवीर मंडळाचे अध्यक्ष दीपक भोसले, मानसिंग जाधव अशोक जाधव यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button