अवघे सिंधुदुर्ग हळहळले : भीषण आगीत तोंडवळीतील सुरूचे बन जळून खाक; जैवविविधेतला मोठा फटका | पुढारी

अवघे सिंधुदुर्ग हळहळले : भीषण आगीत तोंडवळीतील सुरूचे बन जळून खाक; जैवविविधेतला मोठा फटका

आचरा; उदय बापर्डेकर : मालवण तालुक्यतील प्रसिद्ध तोंडवळी येथील समुद्राच्या बाजूने असलेल्या सुरुबनाला आज (दि. २४) दुपारी भीषण आग आगल्याची घटना घडली. या आगीने सुरुचे बन जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जंगल वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मालवण व कणकवली, कुडाळ येथील अग्निशामक बंब दाखल झाले.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास स्मशान भूमीच्या बाजूने तोंडवळी सुरुबनाला आग लागली. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आगीचे लोट पसरत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु आगीची एकूणच तीव्रता आणि त्या तुलनेत आग विझविण्यासाठी कार्यरत असलेले अपुरे मनुष्यबळ यामुळे आगीवर लगेचच नियंत्रण मिळवता येणे कठीण झाले होते. वनविभागाने जेसीबीच्या सहाय्याने जंगलात पसरलेल्या सुरुच्या काड्यांचा खच बाजूला सारत आगरेषा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, आगीच्या दाहकतेमुळे त्यात वारंवार अडचणी येत होत्या.

तरीदेखील वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, वनपाल श्रीकुष्ण परीट,सावळा कांबळे, वनरक्षक  लक्ष्मण आमले, शरद कांबळे, सचिन पाटील, अनिल परब, राहुल मयेकर, प्रकाश आडेलकर तसेच स्थानिक ग्रामस्थ गणेश तोंडवळकर, राजा पेडणेकर, उपसरपंच हर्षद पाटील,ओमकार पाटील, सुमी झाड, नाना पाटील, प्रसाद आंबेरकर,कल्पेश नाईक, सिद्धेश पाटील,विशाल झाड,भोवर, मयूर चेंदवणकर, आशिष पाटील, प्रमोद पाटील बचावकार्यात सहभागी झाले होते. यावेळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या अनन्या पाटील, ग्रामसेवक युती चव्हाण यां घटनास्थळी लागलीच दाखल झाल्या होत्या.

अग्निशामक बंब गाड्यांना विघ्न

तोंडवळीत सुरु बनाला लागलेली आग विझविण्यासाठी तीन अग्निशामक बंब गाड्या मालवण, कणकवली, कुडाळ येथून दाखल झाल्या होत्या. सर्वात प्रथम मालवण येथून नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी आली. पण तिचा पाण्याचा प्रेशर जोरात येत नव्हता. म्हणून कणकवली वरून गाडी बोलवण्यात आली. ती गाडी सुरु वनात आली असता गाडीचा जॉइंट तुटला मुळे ती जागीच बंद पडली. नंतर कुडाळ वरून गाडी बोलवण्यात आली. त्याने काही राहिले आग उशिरा सायंकाळी विजविण्यात आली.

Back to top button