Ratnagiri News : आबलोली चेक नाक्यावर कोल्हापूरातून चिपळूणकडे निघालेल्या विनापरवाना गुळ वाहतूक ट्रकवर कारवाई | पुढारी

Ratnagiri News : आबलोली चेक नाक्यावर कोल्हापूरातून चिपळूणकडे निघालेल्या विनापरवाना गुळ वाहतूक ट्रकवर कारवाई

गुहागर, पुढारी वृत्तसेवा : गुहागर तालुक्यातील आबलोली चेक नाक्यावर कोल्हापूरमधून चिपळूणला आठ टन काळा गुळ घेवून जाणारा ट्रक पकडून, दोघांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरवरून थेट चिपळूणला जाण्याऐवजी संगमेश्वरमधून गुहागर तालुक्यात दाखल होणारा काळ्या गुळाचा ट्रक चिपळूणमध्ये विना परवाना चोर मार्गाने शिरण्याचा प्रयत्न करत होता. (Ratnagiri News)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यामध्ये पोलीस गस्त घालत होते. (दि.16 ) पहाटे तीन वाजता गुहागर तालुक्यातील आबलोली चेक नाक्यावर आठ टन काळा गुळ वाहतूक करणारा ट्रक गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, कॉन्स्टेबल रवींद्र आठवले, अमोल गायकवाड यांच्या देखरेकीमध्ये पकडला गेला.

सदर गुळाची खरेदी पावती आणि परवाना नसल्यामुळे गुहागर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. या मधील असलेल्या मालाची किंमत सुमारे 48 हजार रुपये तर ट्रकची किंमत 2 लाख असून हा मुद्देमाल ताब्यात जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रकचालक मंजुनाथ मगदूम (वय 34, रा. कर्नाटक) आणि साथीदार विकास शिवलकर (वय 35, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ratnagiri News)

हेही वाचा :

Back to top button