रायगडावर ३ तारखेपासून चार दिवस पर्यटकांना बंदी | पुढारी

रायगडावर ३ तारखेपासून चार दिवस पर्यटकांना बंदी

रायगड, पुढारी ऑनलाईन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद सात डिसेंबर रोजी स्वराज्याची राजधानीवर येणार असल्याने रायगडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आली असली तरी नाराजी व्यक्त होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर येत आहेत. खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले होते. त्याचा स्वीकार करत राष्ट्रपती सपत्नीक रायगडावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रायगड-अलिबाग पोलिस अधीक्षकांनी याबाबत आदेश काढले आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर पासून सात डिसेंबर पर्यंत रोप-वेही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग बंद ठेवला आहे. पर्यटकांची गौरसोय होवू नये यासाठी तीन दिवस आधीच हे आदेश दिले आहेत.

राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती. ‘राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत. राष्ट्रपती रायगडाला भेट देणार आहेत ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.’

रायगडावर पर्यटकांना बंदी : रायगडावर येणारे दुसरे राष्ट्रपती

यापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती कै. झेलसिंग हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यानंतर सुमारे तीन दशकांचा कालावधी नंतर देशाचे राष्ट्रपती किल्ल्यावर येत असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : 

Back to top button