जळगाव : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी मागितली लाच ; चोपडा येथे दोघांना अटक - पुढारी

जळगाव : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी मागितली लाच ; चोपडा येथे दोघांना अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात दिव्यांग तपासणी सर्टिफिकेट देण्यासाठी ( दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाच ) नगरदेवळा येथील दोन खासगी व्यावसायिकांनी तक्रारदाराकडून १० हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या माहितीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकार्‍यांनी चोपडा येथे उपजिल्हा रूग्णालयात आयोजीत दिव्यांग तपासणी शिबीराप्रसंगी सापळा लावून या दोघांना १० हजारांची लाच स्विकारताना अटक केली.

तक्रकारदार पारोळा तालुक्यातील कंकराज येथील रहिवासी असून हाताने तो दिव्यांग आहे. रूग्णालयातील तपासणी करणारे डॉक्टर आपल्या ओळखीचे असून अंपगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यावर वाढवून देण्याचे सर्टीफिकेट देवू असे सांगत दोघांनी १० हजार रूपयांची मागणी केली. ( दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाच )

यानंतर तक्रारदाराने चोपडा उपजिल्हा रूग्णालयातील अनिल तुकाराम पाटील( वय-४६, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा जि.जळगाव) आणि विजय रूपचंद लढे (वय -६७, रा. नगरदेवळा, मारवाडी गल्ली, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

यानंतर डीवायएसपी शशिकांत एस. पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सफौ. दिनेशसिंग पाटील, सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. अशोक अहिरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर यांनी

चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे सापळा लावून दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सध्या पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचलंत का?    

Back to top button