Sindhudurg : कुडाळमध्ये १८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही; गुरुजींसाठी शिवसेना रस्त्यावर! | पुढारी

Sindhudurg : कुडाळमध्ये १८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही; गुरुजींसाठी शिवसेना रस्त्यावर!

कुडाळ :पुढारी वृत्तसेवा; कुडाळ तालुक्यात शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालाच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही, शिक्षण मंत्री हाय हाय, मिंंदे सरकारचा निषेध असो अशा गगनभेदी घोषणा देत कुडाळ पंचायत समिती समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले. (Sindhudurg)

Sindhudurg : १८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही

कुडाळ तालुक्यात १८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. या पाश्वभुमिवर कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने कुडाळ पंचायत समिती समोर पालकांना सोबत घेऊन लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात तसेच शिक्षण मध्ये दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. येत्या काळात लवकरात शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कुडाळ गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना (ठाकरे गट)उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,सौ.जानवी सावंत,उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, संतोष शिरसाट,अतुल बंगे,नगरसेविका सौ.श्रुती वर्दम,श्रेया गावंडे,जयभारत पालव,बबन बोभाटे,बाळा कोरगावकर, मिलिंद नाईक, महेश जामदार,स्नेहा दळवी, मुकुंद सरनोबत,वैशाली पावसकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

 

Back to top button