MLC Election | कोकण पदवीधरसाठी मनसेनेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी | पुढारी

MLC Election | कोकण पदवीधरसाठी मनसेनेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अभिजित पानसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती मनसेने त्यांच्या अधिकृत X हँडलवरून दिली आहे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे, असे मनसेने म्हटले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra MLC Election) मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मदरासंघातील निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. १ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • निवडणूक अधिसूचना- ३१ मे २०२४
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- ७ जून २०२४
  • अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत- १२ जून २०२४
  • मतदान- २६ जून २०२४ (सकाळी ८ ते सायंकाळी ४)
  • मतमोजणी- १ जुलै २०२४ (सोमवार)

Back to top button