सिंधुदुर्ग : वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या भिंती झाल्या बोलक्या | पुढारी

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या भिंती झाल्या बोलक्या

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग), पुढारी वृत्‍तसेवा : आज अनेक शाळाच्या भिंती बोलक्या झालेल्या दिसत आहेत. आजच्या डिजिटल युगातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या भिंती बोलक्या करण्यात आले आहेत. वाढती गुन्हेगारी व साईबर क्राईमच्या फसवणूकी नतंरच्या अनेक गुन्हांची माहिती आणि त्यावर होणारे परिणाम याचे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ही कल्पना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची आहे.

पोलीस स्टेशनच्या भिंतींच नागरिकांशी गुन्ह्यांबाबत घ्यायच्या खबरदारी बाबत सांगतात. तेव्हा खाकी वर्दीवर आम जनतेचा विश्वास आणखी वाढतो. वेंगुर्ले पोलीस निरीक्षकांच्या संकल्पनेतून सायबर क्राईमबाबत जनजागृती करणाऱ्या बोलक्या भिंती असणारे कोकणातील पहिले पोलीस स्टेशन आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक तपासणी दरम्यान कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी बोलक्या भिंतींचे पोलीस स्टेशन पाहून त्यांनी सर्वांचे कौतुक केले.

हायटेक झालेल्या आजच्या जमान्यात सायबर क्राईम हा गुन्हेगारी जगताचा मोठा चेहरा बनला आहे. ऑनलाइन फ्रॉड, लग्नाचे आमिष दाखवून पैसे लाटणे, अफवांवर विश्वास ठेवून होणारे गुन्हे, इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर हँडल बाबत ची जनजागृती करणाऱ्या चित्रांच्या माध्यमातून वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत.

सायबर क्राईम बाबत पोलीस दलाच्या वतीने कॉलेज, शाळा , सार्वजनिक ठिकाणी मेळावे घेत , जनतेशी, कॉलेज वयीन युवाईशी संवाद साधत सायबर क्राईम बाबत नेहमीच जनजागृती केली जाते. वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच पुरुष पोलीस आणि महिला पोलिसांचे चित्र असू आत प्रवेश केल्यावर भिंतींवर ठिकठिकाणी चित्रांद्वारे सायबर क्राईम बाबत जनजागृती करण्यात आली आहे. कोणताही गुन्हा घडल्यानंतर डोक्यावर हात मारून घेण्यापेक्षा त्याआधीच आपण सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी तसेच ऑनलाइन फ्रॉडपासून स्वतःला कसे वाचवता येईल याचे अगदी सहजसोप्या भाषेत चित्रांच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन केले आहे.

Back to top button