खेड : गुहागर विधानसभा मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या विजयाचा दावा | पुढारी

खेड : गुहागर विधानसभा मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या विजयाचा दावा

खेड;पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीत आठ ग्रामपंचायतींचे निकाल आज (दि.२०) सकाळपासून जाहीर झाले. खेड तालुक्यातील घाणेखुंट, कोंडिवली, निळीक, संगलट, तिसंगी, भेलसई, अलसुरे, भोस्ते, चिंचवली व कळंबणी बुद्रुक या दहा ग्रामपंचायतींचा यामध्या समावेश होता. त्यापैकी तिसंगी व अलसुरे या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य निवड बिनविरोध झाली होती उर्वरित ८ ग्रामपंचायतींच्या २६ प्रभागांमध्ये ६१ उमेदवार सदस्य पदासाठी निवडणुक रिंगणात होते.

यामधील आठपैकी सहा ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्‍थापित केल्याचा दावा माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत बोलताना शिवसेनेच्‍या उद्धव बाळासाहेब ठाकरे  गटाचे तालुका प्रमुख चंद्रकांत चाळके यांनी केला. भेलसई, अलसुरे, भोस्ते, घाणेखुंट, कोडिवली, निळीक ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्‍थापित केल्‍याचेही चाळके यांनी सांगितले.

मतमोजणीचे काम अव्वल कारकून आर.एम. घुले, मतमोजणी पर्यवेक्षक ए. बी. बाराते, ए.जी. कुळे, एस.एस.मद्रे, यु. व्ही.देशमुख, एस.एस.कदम, ए.एस.पावरी, आर.जी.खेडेकर व सी.बी.चांदोरकर यांनी केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या मार्गदर्शाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

हेही वाचा:

Back to top button