Ratnagiri News: खेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका, महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळले

Ratnagiri News
Ratnagiri News

खेड, पुढारी वृत्तसेवा: खेड शहराला गुरुवारी (दि.१६) दुपारी ३ ते ४ या वेळेत अवकाळी पावसासोबत चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या वादळात खेड -दापोली मार्गासह शहरातील विविध भागात महाकाय वृक्ष कोसळले. दुकाने, घरे यासह निवासी संकुलांचे देखील वादळात नुकसान (Ratnagiri News) झाले आहे.

खेडमध्ये गुरुवारी (दि.१६ मे) दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. खेड – दापोली मार्गावर खेड पंचायत समिती समोर महाकाय वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे अर्ध्या तासाने वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले. या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या टेलिफोन एक्सचेंजच्या बाजूलाच एक दुसरे मोठे झाड कोसळले. शहरातील स्वरूप नगर भागात देखील झाड कोसळले असून अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीज वाहिन्यांवर कोसळल्या. अनेक भागात वीज पुरवठा खंडित (Ratnagiri News) झाला असून, महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news