जपानने बनवले जगातील पहिले 6 जी डिव्हाईस

जपानने बनवले जगातील पहिले 6 जी डिव्हाईस

टोकियो : जपान तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर देशांपेक्षा अनेक पाऊलं पुढे आहे. जपानने आता जगातील पहिले 6जी उपकरण तयार केलं आहे. या जगातील पहिल्या 6 जी डिव्हाईसचा वेग 5 जी पेक्षा 500 पटीने अधिक आहे. यामुळे तुम्ही एका सेकंदात 5 चित्रपट डाऊनलोड करू शकता, इतका याचा स्पीड आहे.

एकीकडे जगात अद्याप 5 जी अनेक भागांमध्ये योग्यरीत्या पोहोचलं नाहीये; पण जपानने 6 जी ची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. जपानने जगातील पहिले 6 ॠ डिव्हाईस प्रोटोटाईप सादर केलं आहे. एका जपानी कन्सोर्टियम कंपनीने अलीकडेच जगातील पहिलं हाय-स्पीड 6जी प्रोटोटाईप उपकरण सादर केलं आहे. जपानने तयार केलेले हे उपकरण काही कंपनीने भागीदारीअंतर्गत बनवलं आहे.

यामध्ये डोकोमो, एनटीटी कॉर्पोरेशन, एनईसी कॉर्पोरेशन आणि फुजीत्सू यांच्या नावांचा समावेश आहे. सध्या 6 जी नेटवर्क चाचणी एकाच उपकरणावर केली गेली आहे. 6 जी नेटवर्कची व्यावसायिक चाचणी अद्याप झालेली नाही. आता याचा एक प्रोटोटाईप म्हणजे मॉडेल बनविण्यात आला असून, त्यांची पुढील चाचणी सुरू आहे. 6 जी नेटवर्कमुळे भविष्यात वापरकर्त्यांना अतिशय वेगवान इंटरनेट स्पीड मिळणार आहे.

या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, या 6 जी डिव्हाईच्या साहाय्याने तुम्ही 100 गीगाबिटस् प्रति सेकंद वेगाने 330 फुटांपेक्षा जास्त अंतरापर्यंत डेटा पाठवू शकते. हा वेग सध्याच्या 5 जी प्रोसेसरपेक्षा 20 पट जास्त आहे. 6 जी डिव्हाईसचा एकूण वेग सरासरी 5 जी फोन स्पीडपेक्षा 500 पट जास्त आहे. या वेगवाने डेटा शेअरिंगचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे. 4 जी वरून जग 5 जी कडे पोहोचलं आहे.

5 जी मुळे व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि मोबाईल ब्राउझिंग यासाठी डेटा क्षमता वाढविण्यावर जग लक्ष केंद्रित करत असताना, जपानने 6 जी नेटवर्कसाठी प्रयत्न सुरू केला आहे. 6 जी च्या वेगासह, रिअल-टाइम होलोग्राफिक कम्युनिकेश आणि इमर्सिव्ह व्हर्च्युअल आणि एआय अनुभव यासारख्या गोष्टी सक्षम होण्यास फायदा होईल. 6 जी नेटवर्क स्पीडचा आनंद घेण्यासाठी अद्याप अनेक गोष्टी करणं बाकी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूलभूत पायाभूत सुविधा. हे तंत्रज्ञान मुख्य प्रवाहात येण्याआधी, या नवीन 6 जी तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारे सेल टॉवर आणि 6जी अँटेना असलेले नवीन फोनदेखील बाजारात उपलब्ध होणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news