राज्यात 110 लाख टन साखर उत्पादन; बारामती अ‍ॅग्रो ऊस गाळप, साखर उत्पादनात राज्यात प्रथम

राज्यात 110 लाख टन साखर उत्पादन; बारामती अ‍ॅग्रो ऊस गाळप, साखर उत्पादनात राज्यात प्रथम
Published on
Updated on

[author title="किशोर बरकाले" image="http://"][/author]

पुणे : राज्यातील ऊस गाळप हंगाम 2023-24 संपुष्टात आला असून 207 कारखान्यांनी एकूण एक हजार 73 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर सरासरी 10.27 टक्क्यांइतक्या उतार्‍यातून 110 लाख टन साखरेचे उत्पादन तयार झाले आहे. कारखान्यांचा सरासरी हंगाम कालावधी 130 दिवसांचा राहिला आहे. तर सरासरी हेक्टरी उत्पादकता 84 टन मिळाली असून गाळप हंगामाची यशस्वी सांगता झाल्याची माहिती साखर आयुक्तालयातून मिळाली.

राज्यात सर्वाधिक ऊस गाळप व साखर उत्पादनात पुणे जिल्ह्यातील बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्याने बाजी मारली आहे. तर कोल्हापूरमधील दालमिया भारत शुगर या खासगी कारखान्याने 12.99 टक्क्यांइतका सर्वाधिक साखर उतारा मिळवत अग्रकम गाठला आहे. राज्यात सर्वाधिक 178 दिवस हंगाम सुरू राहणार्‍या कारखान्यात जुन्नरमधील (पुणे) विघ्नहर सहकारी, श्री सोमेश्वर सहकारी (पुणे) 175 दिवस, अहमदनगरमधील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी 175 दिवस सुरू राहिला.

सर्वाधिक ऊस गाळप करणारे 10 साखर कारखाने ः बारामती अ‍ॅग्रो- पुणे, विठ्ठलराव शिंदे सहकारी माढा-सोलापूर, जरंडेश्वर शुगर मिल्स-गुरु कमॉडिटी सर्व्हीसेस प्रा.लि.-सातारा, दौंड शुगर प्रा.लि. आलेगाव-दौंड, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखाना, हातकणंगले- कोल्हापूर, श्री सोमेश्वर सहकारी बारामती. इंडीकॉन डेव्हलपर्स प्रा.लि. कर्जत-अहमदनगर, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी शिवनगर-बारामती, दि माळेगाव सहकारी-बारामती, श्री दत्त शेतकरी सहकारी शिरोळ-कोल्हापूर.

  • 10.73 कोटी टन ऊस गाळप पूर्ण करून हंगामाची यशस्वी सांगता
  • 12.99 टक्के उतारा मिळवून कोल्हापूरचा दालमिया भारत शुगर अव्वल

साखर उतार्‍यात कोल्हापूर, सांगली, सातारचाच डंका

दरवर्षीप्रमाणे संपलेल्या ऊस गाळप हंगामात सर्वाधिक साखर उतारा मिळविण्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारच्याच कारखान्यांनी बाजी मारली आहे. कोल्हापूरच्या दालमिया भारत शुगर 12.99 टक्के, कुंभी-कासारी सहकारी करवीर-कोल्हापूर 12.91 टक्के, श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी-कागल (कोल्हापूर) 12.63 टक्के, सांगलीतील वाटेगांव येथील राजारामबापू पाटील सहकारी 12.62 टक्के, कारदवाडी येथील राजारामबापू पाटील सहकारी 12.51 टक्के, सातारचा अजिंक्यतारा सहकारी 12.47 टक्के, कोल्हापूरचा भोगावती सहकारी 12.44 टक्के, ओलम ग्लोबल अ‍ॅग्री कमोडिटीज-चंदगड-कोल्हापूर 12.36 टक्के, सांगलीतील पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथ आण्णा नायकवाडी हुतात्मा किसन अहिर 12.31 टक्के आणि कोल्हापूरचा आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुका सहकारी 12.27 टक्के उतारा मिळविला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news