‘आदित्य एल-1’ने टिपली सौर वादळाची छायाचित्रे

‘आदित्य एल-1’ने टिपली सौर वादळाची छायाचित्रे
Published on
Updated on

नवी दिल्ली : सूर्याकडून गेल्या चार दिवसांत पृथ्वीच्या दिशेने सर्वात शक्तिशाली सौर लहरी फेकल्या गेल्या आहेत. ही सौर लहर म्हणजे एक्स 8.7 तीव्रतेचा स्फोट होता. गेल्या 50 वर्षांत प्रथमच सूर्यापासून एवढी शक्तिशाली प्रमाणात सौर लहरी निघाल्या आहेत. या सौर लहरी 11 ते 13 मे दरम्यान दोनदा स्फोट झालेल्या ठिकाणापासून निघाल्या आहेत. इस्रोच्या 'आदित्य-एल1' या अंतराळयानानेही या काळात सूर्याकडून येणार्‍या सौर लहरींची छायाचित्रे टिपली आहेत. इस्रोच्या आदित्य-एल 1 ने 11 मे रोजी एक्स 5.8 तीव्रतेची लाट पकडली. भारत आणि त्याच्या आसपासच्या भागांना सौर वादळाचा फटका बसला नाही. परंतु, अमेरिकन आणि पॅसिफिक महासागराच्या वरच्या भागात त्याचा परिणाम जाणवला. 'चांद्रयान-2' नेही या वादळाचे फोटो घेतले आहेत.

इस्रोने दिलेल्या या माहितीला 'नासा'कडून दुजोरा मिळाला आहे. वॉशिंग्टनमधील नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नोआ) या सेंटरने सूर्यापासून निघालेल्या या धोकादायक लहरी पहिल्या आहेत. गेल्या 50 वर्षांत अशा लहरी आल्या नव्हत्या. यामुळे पृथ्वीवर रेडिओ ब्लॅकआउटस् होण्याचा धोका आहे. हा धोका मेक्सिको भागात जास्त आहे. 11 ते 14 मे दरम्यान सूर्यावर तीन मोठे स्फोट झाले. हे स्फोट एकाच ठिकाणावरून झाले आहेत. त्यामुळे या आठवड्याअखेरी विनाशकारी सौर वादळ आले होते.

सूर्यात अजूनही स्फोट होत आहे. 10 मे 2024 रोजी सूर्यावर एक सक्रिय डाग दिसला. त्याला एआर 3664 नाव दिले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तीव्र स्फोट झाला. सूर्याची एक लहर पृथ्वीकडे आली. ही एक्स 5.8 क्लासची सौर लहर आहे. सौर वादळामुळे पृथ्वीवरील काही भागांत हाय फ्रिक्वेंसी रेडिओ सिग्नल संपले होते. सूर्यावर जो सनस्पॉट तयार झाला आहे तो पृथ्वीपेक्षा 17 पट मोठा आहे. सूर्यावरून आलेल्या तीव्र लहरीमुळे उत्तरी ध्रुवावरील भागात वायूमंडळ सुपरचार्ज झाला आहे. सध्या सूर्यावर जियोमॅग्रेटिक वादळ येत आहेत. त्याला वैज्ञानिक भाषेत एक्स-क्लास म्हणतात. पुढील आठ वर्षे या पद्धतीचे सौर वादळ येण्याचा धोका कायम आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news