Ratnagiri ः दापोली शहरात वृद्धे महिलेने केली आत्महत्या | पुढारी

Ratnagiri ः दापोली शहरात वृद्धे महिलेने केली आत्महत्या

दापोली, पुढारी वृत्तसेवा : आज (दि. २८) रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास दापोली शहरातील काळकाई कोंड परिसरातील डाॅ.पाथुर्डी यांचे इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून वृद्ध महिलेने आत्महत्या केली. (Ratnagiri)

भागिरथी महादेव गोलांबडे (वय ७५) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने तिसऱ्या मजला वरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.  संबंधित महिला ही एकटीच इमारतीत रहात असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. दापोली पोलीस स्थानकात या बाबतची नोंद करणे व पुढील कार्यवाही सुरू आहे. (Ratnagiri)

हेही वाचलतं का?

Back to top button