रत्नागिरी : पोसरे येथे दरड कोसळलेल्या दुर्घटनेत १७ जण बेपत्ता | पुढारी

रत्नागिरी : पोसरे येथे दरड कोसळलेल्या दुर्घटनेत १७ जण बेपत्ता

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील पोसरे येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये सात घरे दरडीखाली गाडली गेली असून, शोधकार्य सुरु आहे. तर यातील सात जण जखमी झाले आहेत जखमींवर तातडीने उपचार सुरु आहेत. पोसरे येथे झालेल्या घटनेतील ७ जण जखमी असल्याचे समजते आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना महापूर आला आहे. दरम्यान पूर ओसरत असला तरी धोका कायम आहे.

या दुर्घटनेत रंजना रघुनाथ जाधव (५०), रघुनाथ जाधव (५५), विकास विष्णू मोहिते (३५), संगिता विष्णू मोहिते (६९), सुनील धोंडीराम मोहिते (४७), सुनिता धोंडीराम मोहिते (४२).

आदेश सुनील मोहिते (२५), काजेल सुनील मोहिते (१९), सुप्रिया सुदेश मोहिते (२६), विहान सुदेश मोहिते (५), धोंडीराम देवू मोहिते (७१).

सविता धोंडीराम मोहिते (६९), वसंत धोंडीराम मोहिते (४४), वैशाली वंसत मोहिते (४०), प्रिती वसंत मोहिते (९).

सचिन अनिल मोहिते (२९), सुमित्रा धोंडू म्हापदी (६९) या १७ जणांचा अजुनही पत्ता लागलेला नाही.

या दुर्घटनेत जखमी झालेल्यांत अनिल रघुनाथ मोहिते (४९), वसंती रघुनाथ मोहिते (६८), प्रिती सचिन मोहिते (२७), सुरेश अनिल मोहिते (२७), सनी अनिल मोहिते (२५), सुजेल वसंत मोहिते (१८), विराज सचिन मोहिते (४) यांचा समावेश आहे.

दरम्यान मंडणगड तालुक्यात एका पुरुषाचा मृतदेह आढळला आहे.

पान्हळे खु. येथे बाळराम गोविंद काप यांचा बैल नदीच्या प्रवाहात वाहून गेला आहे.

लाटवण येथे पुल खचल्यामुळे महाड-मुंबई -पुणे रस्ता बंद आहे.

दापोली तालुक्यातील मुगीज येथे जि. प.शाळ क्र. १च्या भिंतीवर आंब्याचे झाड पडून ६ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

Back to top button