maharashtra rain update : ९ जिल्ह्यात महापुराचे रौद्ररुप, ७६ जणांचा बळी | पुढारी

maharashtra rain update : ९ जिल्ह्यात महापुराचे रौद्ररुप, ७६ जणांचा बळी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  maharashtra rain update : राज्यातील ९ जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापुराच्या प्रचंड विळख्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, मुंबई, उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे, या ९ जिल्ह्यात महापुराचा विळखा मोठ्या प्रमाणात बसला आहे. या महापुरामध्ये ७६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अद्यापही ५९ जण बेपत्ता आहेत. तर ७५ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

maharashtra rain update

महापुराच्या प्रचंड वेढ्यात सापडलेला महाड, चिपळूण आणि खेड भाग गुरुवारी रात्रीपासून दरडींच्या दहशतीखाली असून, महाडमधील तळीये गावात ३२ घरांवर दरड कोसळली. त्यात ३८ ग्रामस्थांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रायगड जिल्ह्यातील बाजूला पोलादपूर तालुक्यात गोवेले येथे भूस्खलन होऊन १७ जण दरडीखाली गाडले गेले. त्यात त्यांचा करुण अंत झाला.

या दुर्घटनेत १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मागच्या ४८ तासांत राज्यात दरड कोसळून १२९ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.

लष्कर आणि एनडीआरफचे सहाय्य

राज्यात एकुण २५ एनडीआरफच्या तुकड्या कार्यरत आहेत. मुंबई २, ठाणे २, पालघर १, रायगड १, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग २, सांगली २, सातारा ३, कोल्हापूर ४, पुणे २, तुकड्या कार्यरत आहेत.

ओडिशातून ८ तुकड्या कोल्हापूर, सांगली साताऱ्यासाठी

तर कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागातील पुरपरिस्थिती पाहता ओडिशा राज्यातील भुवनेश्वरहून मागविल्या ८ तुकड्या मागवण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर २, सातारा १, सांगली २ या भागात तैनात केल्या जाणार आहेत तर २ तुकड्या पुणे येथे राखीव असतील.

याचबरोबर तटरक्षक दलाच्या ३, नौदलाच्या ७, लष्कराच्या ३ तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे कार्यरत असणार आहेत. एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या कार्यरत असणार आहेत.

तर ५९ बोटी नागरीकांना बाहेर काढण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. यातील ४८ एनडीआरएफ आणि ११ एसडीआरएफकडे बोटी असणार आहेत.

महाड येथील परिस्थितीसाठी एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटना स्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत.

नंतर त्यांनी बचाव कार्य सुरु केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रावर नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

२ कोटी रुपये निधी

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपये देण्यात आली आहे.

पाउस आणि पाणी ओसरल्याने मदत कार्यास वेग देण्यात आला आहे

१००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

 

Back to top button