जालना : निकृष्ट दर्जाच्या बर्फाची विक्री | पुढारी

जालना : निकृष्ट दर्जाच्या बर्फाची विक्री

जालना ः जिल्ह्यात शीतपेयांमध्ये वापरला जाणार्‍या बर्फाचा दर्जा तपासणे आवश्यक आहे. खाद्य बर्फामध्ये निळसर खाद्यरंगाचा किमान 10 पीपीएम वापर करणे बंधनकारक असल्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहे. मात्र जिल्ह्यात या निर्देशांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने फक्त बर्फ कारखान्यातून बर्फाचे नमुने घेतले जातात. प्रत्यक्षात शीतपेय विक्रेत्यांकडे वापरण्यात येणारा बर्फ खाद्य आहे किंवा अखाद्य याची पडताळणी होत नाही. खाद्य दर्जाचा बर्फ पिण्यायोग्य पाण्यापासून तयार करावा, तो रंगहीन असला पाहिजे.

अखाद्य बर्फात इंडिगो कॅरमाइन किंवा ब्रिलियंट ब्लू एफसीएफ रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगाची छटा निर्माण होईल, एवढा किमान 10 पीपीएम असला पाहिजे. मात्र, या निर्देशांकडे कोणी लक्ष देत नाही. शीतपेयांची खरेदी करताना पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र शहरात मोठया प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या बर्फाची विक्री होताना दिसत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button