‘आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्यदर्शन’ एकदिवसीय साहित्य संमेलन सोमवारी | पुढारी

‘आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्यदर्शन’ एकदिवसीय साहित्य संमेलन सोमवारी

पुणे : साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांच्या साहित्यिक प्रवासावर आधारित ‘आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्यदर्शन’ या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे सोमवारी (दि.4) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 ते सायंकाळी 8 या वेळेत नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हे साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने सोनग्रा यांचा सप्तर्षी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सत्कार समारंभानंतर सोनग्रा यांच्या साहित्य प्रवासावर प्रकट मुलाखत होणार आहे.

उद्घाटनानंतर डॉ. कीर्तीपाल गायकवाड सोनग्रा यांच्या साहित्यकृतीवर आधारित ‘एकपात्री कबीर’ हा कार्यक्रम सादर करतील; तसेच ‘जांबुवंतराव चंद्रावर’ या साहित्यकृतीचे अभिवाचन आणि त्यानंतर सोनग्रा यांची नाट्यसृष्टी या विषयावर परिसंवाद होईल. ‘मी महात्मा फुले बोलतोय’ या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण कुमार आहेर करतील, ‘प्रभाव’ या पुस्तकातील लेखांचे अभिवाचन, तसेच ‘आम्ही टॉर्च विकतो’ या साहित्यकृतीचे अभिवाचन होईल. सायंकाळी सोनग्रा यांची ‘साहित्यसृष्टी’ या विषयावर परिसंवाद होणार असून, या संमेलनाचा समारोप सायंकाळी सात वाजता होणार आहे.

 

Back to top button