Nagar : दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून केला शासनाचा निषेध | पुढारी

Nagar : दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून केला शासनाचा निषेध

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : दुधाला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर भारतीय किसान सभेचे नेते कॉ अजित नवले यांच्यानेतृत्वाखाली संतप्त झालेल्या दूध उत्पादक शेतकर्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत राज्य शासनाचा व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध केला.

शेतकऱ्याच्या दुधाचा भाव 34 रुपया वरून सरळ 27 रुपयांवर खाली आलेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने दुधाला कमीत कमी 34 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी भारतीय किसान सभेने केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 34 रुपये भाव देण्याचे ठरले होते. मात्र खाजगी दूध संघ शेतकऱ्यांच्या दुधाला 34 रुपये भाव देण्यास तयार नाही. त्यामुळे सर्व दूध उत्पादकांत राज्य सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यातील जे दूध संघ दुधाला 34 रुपये हमी भाव देत नाही अशा दूध संघांवर सरकारने कारवाई करावी किंवा सरकारला भाव देणे परवडत नसेल तर सर्वच दूध उत्पादकांना राज्य सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली असल्याची अखिल भारतीय किसान सभेचे नेते कॉ अजित नवले यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button