‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीची राजकारणात एन्ट्री, भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीची राजकारणात एन्ट्री, भाजपमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने भाजप पक्षात प्रवेश केला आहे. आता अभिनयासोबतच ती राजकारणात देखील दिसेल. रुपाली सध्या ‘अनुपमा’ या टीव्ही मालिकेत काम करत आहे. रुपाली सोबत चित्रपट दिग्दर्शक अमय जोशीनेदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमयने अनेक मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

रुपालीचे करियर

रुपाली अनुपमा या मालिकेतून प्रसिद्ध झाली. इन्स्टाग्रामवर २.९ मिलियन म्हणजेच २० लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. काही दिवसांपूर्वी तिने मुंबईमध्ये आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला होता.

भाजपमध्ये प्रवेश

दिल्ली मुख्यालयात रुपालीने तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक अंतर्गत भाजपची सदस्यता घेतली. भाजपी जनरल सेक्रेटरी विनोद तावडे आणि नॅशनल मीडिया डिपार्टमेंट इन्चार्ज अनिल बलूनी यांनी रुपालीला सदस्यता दिली.

Back to top button