ज्यांनी घरं फोडली, त्यांचेच घर फुटले : आ. राम शिंदे | पुढारी

ज्यांनी घरं फोडली, त्यांचेच घर फुटले : आ. राम शिंदे

मिरजगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जैसी करणी वैसी भरणी, ज्यांनी दुसर्‍याची घरं फोडली त्यांचेच घर फुटले. ज्यांनी पाप केलंय त्यांनाच ते फेडावं लागतंय. आता न्याय इथंच आहे. मी कधी देखावा केला नाही, काम केले. आता हे जनतेला पटले आहे, असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले. कर्जत तालुक्यातील आंबिजळगांव येथे ते बोलत होते. ते म्हणाले पक्षाने संधी दिली, त्याला मी न्याय दिला. पालकमंत्री असताना अनेक कामे मार्गी लावली. जलयुक्त शिवारच्या दर्जेदार कामामुळे गेल्या पाच वर्षांत टँकर लागले नाहीत. कर्जतला भीषण पाणी टंचाई होती. याचा आम्ही देखावा केला नाही.

गेली तीन वर्षे कुकडीचे पाणी नव्हते, ते आता सुरळीत केले. यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला. तुकाई उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावला. राशीन-चापडगाव हा रस्ता केला. तो आता कुठंय तेच कळत नाही. रस्ता गावाला झाला, पण सजा मला मिळाली. कर्जत तालुक्यात माझा एक गुंठा नाही. मी आठ वर्षांत घर बांधले, त्याची चर्चा झाली. त्यांनी अडीच वर्षांत बंगला बांधला, त्याची मात्र चर्चाच नाही. हे सर्व जनतेच्या लक्षात आले आहे.

यावेळी प्रवीण घुले, भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, शंकरराव नेवसे, सरपंच विलास निकत, नीलेश शेलार, नारायण जगताप, भीमराव निकत, अनिल गदादे, शरद म्हेत्रे, भारत मासाळ, गणेश पालवे, दिलीप जाधव, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. कल्याण अनारसे यांनी प्रस्ताविक केले. नीलेश दिवटे यांनी सूत्रसंचलन केले. मच्छिंद्र अनारसे यांनी आभार मानले.

हेही वाचा

Nashik Crime : पोलिस चौकीच्या मागेच स्कॉर्पिओची चोरी (CCTV)

चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाची २२ दिवसांनतर आज सांगता

कोल्हापूर : रवीच्या संघर्षमय जीवनाला मिळाला न्याय; पोलीस भरतीत यश

Back to top button