नगर : मारहाण, धमकीप्रकरणी मुलगा, आईविरुद्ध गुन्हा | पुढारी

नगर : मारहाण, धमकीप्रकरणी मुलगा, आईविरुद्ध गुन्हा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  तुला जास्त झाले आहे. चाकूने खूपसुन टाकीन, नीट रहा नाहीतर तुला गाडीखाली घालुन मारुन टाकीन, अशी जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे (दि. 7 ऑगस्ट) रोजी घडली.
सचिन सोपान कोपनर (वय 25 वर्षे, रा. तमनर आखाडा, ता. राहुरी) हा तरूण (दि. 7 ऑगस्ट) रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास तमनर आखाडा येथील मोरया मेडिकलसमोर उभा होता. तेथे तमनर आखाडा येथील लंकाबाई दशरथ पांढरे ही महिला आली. तिने सचिन कोपनर याला घाण शिवीगाळ केली., मला शिव्या का देता, असे सचिन कोपनर तिला म्हणाल्याचा राग आल्याने तिने सचिन कोपनर यास लाकडी दांडक्याने मारहाण केली व तेथून निघून गेली.

यानंतर तेथे लंकाबाई पांढरे हिचा मुलगा यशवंत दशरथ पांढरे आला. तो सचीनला म्हणाला की, तुला जास्त झाले आहे. तुला चाकूने खूपसुन टाकीन, नीट रहा नाहीतर तुला गाडीखाली घालुन मारुन टाकीन, अशी जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या मारहाणीमध्ये सचीन कोपनर याला मार लागला आहे. सचिन सोपान कोपनर याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून लंकाबाई दशरथ पांढरे व यशवंत दशरथ पांढरे (दोघे रा. तमनर आखाडा, ता. राहुरी) या मायलेकाविरुद्ध मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलिस करीत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :

पुणे : ढोल, ताशांची संख्या निश्चित करावी; कार्यकर्त्यांची मागणी

पुणे : रस्त्यावरील खड्ड्यांवरून अभियंत्याला नोटीस

Back to top button