पुणे : रस्त्यावरील खड्ड्यांवरून अभियंत्याला नोटीस

पुणे : रस्त्यावरील खड्ड्यांवरून अभियंत्याला नोटीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी दिलेली मुदत संपल्यानंतर महापालिका अधिकार्‍यांनी कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. सातारा रस्त्यावरील पद्मावती येथे पडलेल्या खड्ड्याला कारणीभूत ठरलेल्या एका कनिष्ठ अभियंत्याला गुरुवारी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. यंदाच्या पावसाळ्यात मागीलवर्षीप्रमाणेच जवळपास सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. यावरून महापालिका प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.

प्रशासनाने जुलैमध्ये पाऊस सुरू असतानाच खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. परंतु सततच्या पावसामुळे या कामांत अडथळे येत होते. सातत्याने टीका होत असल्याने प्रशासनाने 9 ऑगस्टपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित भागातील अधिकार्‍यांना दिले होते. सुदैवाने मागील आठ दिवसांत शहरातील पावसाचे प्रमाणही कमी झाले असून, ठिकठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

खड्डे दुरुस्तीची मुदत बुधवारी संपल्यानंतर गुरुवारी खड्डे असलेला रस्ता ज्या अभियंत्याच्या अखत्यारीत येतो, त्या अभियंत्यावर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. याची सुरुवात पद्मावती येथील खड्ड्याप्रकरणी एका कनिष्ठ अभियंत्याला नोटीस देऊन करण्यात आली. रोज खड्ड्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news