पाथर्डीत पाच लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

पाथर्डीत पाच लाखांचा गुटखा जप्त

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ढवळेवाडी शिवारात अपघातग्रस्त मालवाहू टेम्पोतून सुमारे पाच लाख दहा हजार रूपये किमतीचा हिरा कंपनीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. टेम्पोचालक दत्तू नामदेव खेडकर (रा.चुंभळी, ता. पाथर्डी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ढवळेवाडी शिवारातून रात्रीच्या वेळेस चालक खेडकर हा चारचाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक करत असताना, हे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्ड्यात जाऊन अपघात झाला. त्यामुळे परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. खेडकर याला कोणताही मार लागलेला नव्हता. नागरिकांनी गाडीत काय आहे, याची पाहणी केली असता बंदी घातलेला गुटखा असल्याचे लक्षात आले.

येताच नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवल्या नंतर पोलीस पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी मालवाहू गाडी व खेडकर याला पाथर्डी पोलीस स्टेशनला आणले. या गाडीमध्ये 5 लाख 10 हजार रुपयांचा हिरा कंपनीचा गुटखा होता. पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र रामदास बडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 5 लाख 10 हजार रूपयांचा गुटखा व तीन लाख रुपयांचा टेम्पो, असा एकूण आठ लाख दहा हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे हे तपास करीत आहे

Back to top button