राहुरी : मान्सूनच्या आगमनाने शेतकरीराजा सुखावला | पुढारी

राहुरी : मान्सूनच्या आगमनाने शेतकरीराजा सुखावला

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मान्सूनला सुरूवात होऊनही तीन आठवड झाले, तरी पावसाने पाठ फिरवली होती. अखेर काल सरी कोसळल्याने शेतकरी राजा काहीसा सुखावला आहे. पावसाने अशीच कृपा ठेवावी अशी विनवणी शेतकर्‍यांकडून वरूण राजाला होत आहे. राहुरी हद्दीत शनिवारी दुपारच्या सत्रात पावसाचे आगमन झाले. मान्सून प्रारंभापासून शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. खरीप पेरण्याही खोळंबल्या होत्या. पाऊस पडत नसल्याने चिंतातूर असलेल्या शेतकर्‍याला काल काहीसा दिलासा लाभला.

राहुरी शहरासह बारागाव नांदूर, वांबोरी, टाकळीमिया, देवळाली प्रवरा, ब्राम्हणी, म्हैसगाव, ताहाराबाद, सोनगाव, निभेंरे आदी सर्वच मंडळात पावसाने हजेरी दिली. तासाभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला. खरीप हंगामात सुमारे 32 हजार 817 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीकांचे नियोजन हाती घेण्यात आलेले आहे. बाजरी, मका, तूर, मुग, भुईमूग, सोयाबीन, कापूस व ऊस क्षेत्राचे यंदा खरीप हंगामात नियोजन करण्यात आले आहे. खरीप पेरण्यांसाठी शेतकर्‍यांना मान्सून गरजेचा होता.

हेही वाचा

दिल्ली: प्रगती मैदान बोगद्याजवळ व्यवसायिकाला लुटणाऱ्या ५ चोरट्यांना अटक

मावळातील पवना धरणात केवळ 17 टक्के साठा

Back to top button