

पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील प्रगती मैदान बोगद्याजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका व्यवसायिकाला लुटल्याची घटना शनिवारी (दि.२४ जून) घडली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली हाेती. याच्या आधारे तपास करत दिल्ली पाेलिसांनी टाेळी जेरबंद केल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
दिल्लीतील इंडिया गेट ते रिंगरोडला जोडणाऱ्या प्रगती मैदान बोगद्यातून व्यावसायिकाची कार बाहेर पडताच दोन बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी गाडीचा दरवाजा उघडला. व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत दोन लाख रुपयांची राेकड लुटली हाेती. या प्रकरणी नवी दिल्ली टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.