नगर : राहुरी फॅक्टरीचे व्यापारी देसर्डांचा अपघातात मृत्यू | पुढारी

नगर : राहुरी फॅक्टरीचे व्यापारी देसर्डांचा अपघातात मृत्यू

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी फॅक्टरी येथील 42 वर्षीय व्यापारी जयेश देसर्डा यांचा (सोमवारी) रात्री अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, जयेश देसर्डा यांचे गुहा गावात किराणा दुकान आहे. किराणा दुकानातील काम आटोपल्यानंतर जयेश हे राहुरी फॅक्टरी येथे घरी जात असताना नगर-मनमाड मार्गावरील मुसमाडे पेट्रोल पंपानजीक परराज्यातील एका वाहन चालकाशी देसर्डा यांची शाब्दिक चकमक उडाली. यानंतर देसर्डा यांनी आपली दुचाकी पेट्रोल पंप परिसरात लावून, माल वाहतूक ट्रक चालकास ड्रायव्हर साईटला जाऊन खाली उतरवत होते, परंतु माल वाहतूक चालक खाली न उतरता त्याने ट्रक चालू केला.

त्यामुळे देसर्डा हे ड्रायव्हर साइडच्या पायरीवर पाय ठेऊन ड्रायव्हर साईडच्या खिडकीला लटकले. माल वाहतूक ट्रक जोगेश्वरी आखाडा काका ढाबा परिसरातील पोहचत असतानाच रस्त्यावर एकेरी वाहतूक चालू असल्याने समोरून कापूस घेऊन चाललेले वाहन व सदरचे माल वाहतूक गाडी घासल्याने यामध्ये देसर्डा दबल्याने यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. देसर्डांचा अपघाती मृत्यु झाला की घातपात, याबाबत चर्चा सुरू होती. मृत देसर्डांच्या पश्चात आई-वडील, भाऊ-भावजय, तीन मुले, बहिणी असा मोठा परिवार आहे. या अपघातान एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) सकाळी पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे, पो. उ. निरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा यांनी अपघातस्थळी पाहणी केल्यानंतर मुसमाडे पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ट्रक चालक व देसरडा यांच्यात बाचाबाची असल्याचे दिसले.

Back to top button