नगर : मनपाच्या निष्क्रियतेमुळे नाट्यसंकुल रखडले; राष्ट्रवादी काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन | पुढारी

नगर : मनपाच्या निष्क्रियतेमुळे नाट्यसंकुल रखडले; राष्ट्रवादी काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन

नगर; पुढारी वृत्तसेवा : निधी मंजूर असूनही प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्य संकुल व गुलमोहर रस्त्याचे काम रखडले आहे. अधिकार्‍यांच्या निष्क्रीयतेमुळे विकासकामे मार्गी लागत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला. येत्या आठ दिववसांत प्रश्न न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, युवक शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, युवतीच्या शहराध्यक्ष अंजली आव्हाड, सचिन अकोलकर, चैतन्य कुलकर्णी आदी उपस्थित होते. गुलमोहर रस्ता व सावेडी नाट्य संकुल महत्त्वकांशी व जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या कामासाठी निधी उपलब्ध असूनही, ठेकेदार व मनपा अधिकारी यांच्या हेव्यादाव्यामुळे व नियोजन शून्य कारभारामुळे कामे रखडली आहेत.

Back to top button