नगर : तिसर्‍या दिवशीही रंगला महिला कुस्ती थरार | पुढारी

नगर : तिसर्‍या दिवशीही रंगला महिला कुस्ती थरार

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  दादा पाटील महाविद्यालयातील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेमधील रविवारचा दिवस थरारक ठरला. आज झालेल्या दोन्ही गटातील कुस्तीमध्ये पंजाबच्या महिला खेळाडूंचे वर्चस्व दिसले. तर महाराष्ट्राची पाटी मात्र कोरी राहिली. आज रविवारी सुट्टी असल्यामुळे कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी प्रेक्षकांनी केली होती. आज दोन्ही गटांमध्ये अनेक लढती चुरशीच्या झाल्या. रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालयात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन दि. 6 ते 9 जानेवारी 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. रविवार दि. 8 जानेवारी रोजी 65 किलो व 72 किलो वजनी गटातील कुस्त्या संपन्न झाल्या.

65 किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती- शेफाली, महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतक, रौप्य पदक विजेती- मुस्कान देवी, गुरू नानक देव विद्यापीठ अमृतसर, व कांस्यपदक विजेत्या मोनिका, महाराजा गंगा सिंग विद्यापीठ बिकानेर व वर्षा, चौधरी देविलाल विद्यापीठ सिरसा यांना पदके मिळाली.  72 किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती जगबीर सिंह, ओपीजेएस चारू विद्यापीठ राजस्थान, रौप्यपदक विजेती हनी, राजा महेंद्रप्रतापसिंग विद्यापीठ अलिगढ, व कांस्य पदक विजेत्या मंजू, गुरूनानक देव विद्यापीठ अमृतसर व निकिता, भगत फूल सिंग महिला विद्यापीठ, खानपूर कलान यांनी पदके मिळवली.

65 व 72 किलो वजनी गटातील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्या सर्व खेळाडूंना पदके देवून गौरविण्यात आले. पदक विजेत्या स्पर्धकांच्या सत्कार सोहळ्याला बारामती अ‍ॅग्रोचे सर्वेसर्वा राजेंद्र पवार, प्रा. मधुकर (आबा) राळेभात, बाळासाहेब साळुंके, नामदेव राऊत, सुभाष गुळवे, जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे, स्पर्धा निरीक्षक डॉ. राजेंद्र खत्री, स्पर्धेचे टेक्निशिअन गुंड, दत्ता महादम, महेंद्र गुंड, नितीन धांडे, विश्वनाथ जाधव, सुभाषचंद्र तनपुरे, डॉ. राहूल भोसले, डॉ. शिवाजी उत्तेकर, प्रा. बी. एस. पाटील, एल. के., दत्तात्रय सोलनकर, नारायण नेटके, मुरलीधर धांडे, डॉ.देवकाते, अ‍ॅड बागल, अमित जाधव, अरूण फाळके, पोपट तोरकड, दादा तनपुरे, बी. एस. पाटील, शांतीलाल सुद्रिक, सागर पवळ, राहूल नवले, सागर गंगावणे, जगन्नाथ झेंडे, गणेश सुद्रिक, डॉ. वाळूंजकर, गाढवे, सावन शेटे, डॉ. शांताराम साळवे, बापू तोरडमल, मोहनतात्या गोडसे, संदीप रणसिंग, लक्ष्मण ढेपे, अंकुश पठाडे, वैभव बाबर, सचिन दरेकर, संजय तोरडमल, नानासाहेब सुद्रिक, संजय भैलुमे, गणेश सुद्रिक, संदीप शेगडे, राजेंद्र लाळगे, दीपक यादव आदिंच्या उपस्थितीत संपन्न झाला.

विजेत्या खेळाडूंचा सन्मान

कर्जत नगरपंचायतचे नगरसेवक, कर्जतमधील सामाजिक संघटना, पत्रकार संघ, रोटरी क्लब, कर्जत-जामखेड क्रीडा संघटना आदि संघटनांच्या उपस्थितीत पदकविजेत्या स्पर्धकांचा सत्कार झाला.विजेत्या सर्व स्पर्धकांचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर, स्पर्धा संयोजक डॉ.संतोष भुजबळ, प्रा. शिवाजी धांडेंसह, उपस्थित कुस्तीप्रेमींनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

Back to top button