संगमनेरला 37 ग्रामपंचायत निवडणुकांचे रणशिंग फुंकले | पुढारी

संगमनेरला 37 ग्रामपंचायत निवडणुकांचे रणशिंग फुंकले

संगमनेर / संगमनेर शहर :  पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील 37 ग्राम पंचायतींच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकांसाठी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी जनतेतून निवडून येणार्‍या सरपंच पदाच्या निवडणुकां साठी 251 तर सदस्यपदासाठी 1325 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तह सीलदार अमोल निकम यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे.37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 26 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत 51 हजार 772 पुरुष तर 47 हजार 614 महिला असे एकूण 99 हजार 386 मतदार 37 सरपंच तर 133 प्रभागातील 367 ग्रामपंचायत सदस्यांचे भवितव्य ठरविणार आहेत.

शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 251 तर सदस्य पदासाठी 1325 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने सर्व दृष्टीने सुदृढ अस णार्‍यांना उमेदवारी देण्याकडे सत्ताधारी व विरोधकांचा कल असणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकांकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व त्यांचे पारंपरिक विरोधक महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. या दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते या निवडणुकांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण- कोणाला किती चितपट करेल, हे मतमोजणीनंतरच खर्‍या अर्थाने समजणार आहे, असे तरी चित्र सध्या दिसत आहे.

99 हजार 386 मतदार ठरविणार भवितव्य..!

या निवडणुकीत 51 हजार 772 पुरुष तर 47 हजार 614 महिला असे एकूण 99 हजार 386 मतदार 37 सरपंच आणि 133 प्रभागातील 367 ग्रामपंचायत सदस्यांचे भवितव्य ठरविणार आहेत.

Back to top button