साकूरला चोरट्यांनी कपड्याचे दुकान फोडले | पुढारी

साकूरला चोरट्यांनी कपड्याचे दुकान फोडले

बोटा; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील चौफुलीवर संगमनेरकडे जाणार्‍या रस्त्यालगत असलेल्या गुरुदत्त कलेक्शन कापड दुकान अज्ञात चोरट्यांनी दि. 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फोडण्याची घटना घडली आहे. साकुर जवळील बिरेवाडी येथील विनायक देवराम ढेंबरे हे बिरेवाडी गावातील रहिवासी असून त्यांचे साकुर गावातील चौफुलीजवळील रस्त्यालगत गुरुदत्त कलेक्शन कापड दुकान व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे विनायक ढेंबरे शनिवारी सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले होते.

परंतु मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीच्या वायरी तोडून सीसीटीव्ही बॉक्स बंद केला. दुकानातील मांडण्यावरील सर्व कपड्यांची उचकापाचक करत अस्ताव्यस्त करून टाकून दिले.

दरम्यान रविवारी सकाळी विनायक ढेंबरे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. दुकानात जाऊन बघितले तर कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घटनेची पो. कॉ बांडे, भांगरे, तळपाडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. अज्ञात चोरट्यांनी कपडे मोठ्या प्रमाणात चोरून नेल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button