भरधाव एसटीची कारला धडक ; कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे किरकोळ जखमी | पुढारी

भरधाव एसटीची कारला धडक ; कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे किरकोळ जखमी

नेवासा: पुढारी वृत्तसेवा  :  तालुक्यातील खेडले काजळी येथील कृषी तज्ज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांच्या गाडीला प्रवरासंगम येथे अपघात झाला. या अपघातात सुदैवाने ते किरकोळ जखमी झाले आहेत.  तालुक्यातील प्रवरासंगम येथे सकाळी दहा वाजता जालना-पुणे गाडीने डॉ. ढगे यांच्या कियासोनेट (एम.एच.17 सी. एम. /4723) कारला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचे नुकसान झाले. तथापि डॉ. ढगे यांना काही दुखापत झाली नसून त्यांना किरकोळ मार लागला आहे. डॉ. ढगे यांचा प्रवरासंगम बसस्थानकावर अपघात झाल्याचे समजताच नागरिकांनी गर्दी केली.

नेवासा तालुक्याला डॉक्टर हे एक लाभलेले चांगले व्यक्तिमत्व असून त्यांनी शेतकर्‍यांना कृषी तंत्रज्ञानाबाबत अनमोल मार्गदर्शन केले आहे. डॉ. ढगे हे सुखरूप असल्याचे समजताच अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, औरंगाबाद-अहमदनगर रोडवरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी गतिरोधक व रुंद जागा असणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button