कोल्हापूर : ट्रकने दिलेल्या धडकेत परप्रांतीय तरूणाचा जागीच मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : ट्रकने दिलेल्या धडकेत परप्रांतीय तरूणाचा जागीच मृत्यू

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर श्रीराम टायर समोर आयशर ट्रकने पादचाऱ्यास धडक दिली. या अपघातात परप्रांतीय पादचारी जागीच ठार झाला. अपघातातील मृताचे नाव शुभम राजभर (रा. गाजीपूर उत्तर प्रदेश सध्या रा. चव्हाण बिल्डींग एच एम टी फाटा नागाव) असे आहे. या अपघाताची नोंद रात्री उशीरापर्यंत शिरोली पोलिस स्‍टेशनमध्ये झाली नव्हती.

पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेल्‍या माहितीनुसार शुभम राजभर हा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील क्रृम अलॉय या कंपनीत कामास होता. (रविवार) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कामावरून सुट्टी झाल्‍यानंतर तो आपल्या मित्रांसोबत रूमवर जात होता. यावेळी श्रीराम टायर या कंपनीनजवळ आला असता पाठीमागून आयशर ट्रक (क्रमांक एम एच ०९ एल ३३८९ ) या ट्रकने या परप्रांतीय पादचाऱ्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात सोबत असणारे त्याचे मित्र सुखरूप वाचले.

हा आयशर ट्रक आष्टा येथील एका खासगी कंपनीतून कास्टींग भरून शिरोली औद्योगिक वसाहतीतील काही मशिन शॉप कंपनीत उतरवीण्यासाठी येत असताना हा अपघात झाला.

हेही वाचा : 

Back to top button