पारनेर: खा. विखेंमुळे पारनेरला 100 कोटींचा निधी | पुढारी

पारनेर: खा. विखेंमुळे पारनेरला 100 कोटींचा निधी

पारनेर: पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय जलजीवन मिशन योजने अंतर्गत पारनेर तालुकासाठी खा. सुजय विखे पाटील यांनी 100 कोटीपेक्षा जास्त निधी दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. हा निधी दिल्याबद्दल झावरे यांनी खा. विखे यांचे आभार मानत लवकरच योजनेंच्या कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्व. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात भारत निर्माण ही योजना सुरू झाली. झावरे उपाध्यक्ष असताना भाळवणी, ढवळपुरी, वासुंदे, हंगा, धोत्रे, सावरगाव, वडगाव सावताळ, पळशी, टाकळी ढोकेश्वर या गावांना सुमारे 40 कोटी पेक्षा जास्त निधी त्यावेळी पारनेर तालुक्यासाठी आणल्याचा दावा झावरे यांनी केला.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेतंर्गत खासदार सुजय विखे यांच्यामुळे वाडेगव्हाण, कळस, पोखरी, कर्जुले हर्या, नांदूर पठार, पाडळी दर्या, रांजणगाव ’शिद, नारायण गव्हाण, पळशी, वडगाव सावताळ/ गाजदीपूर, रेनवडी, ढोकी, भाळवणी, वारणवाडी, कडुस, खडकवाडी/जांभुळवाडी, रांधे, जाधववाडी, पिंप्री जलसेन, ढवळपूरी/भनगडेवाडी, वाघुंडे बु., वाघुंडे खू., कुरुंद, दरोडी, म्हसे खुर्द, अळकुटी, गारखिंडी, म्हसणे सुलतानपुर, वडनेर हवेली, लोणी हवेली, टाकळी ढोकेश्वर, पोखरी, पिंप्री गवळी, वडुले, सिध्देश्वरवाडी, मुंगशी, काकणेवाडी, वडनेर बू., सांगवी सूर्या, घाणेगाव, हंगा, गुणोरे, गटेवाडी, शेरीकासारे, पिंपळनेर, तिखोल, जातेगाव, भाळवणी, पाबळ, मांडवे खू ., कोहोकडी, पानोली, पाडळी आळे, म्हस्केवाडी, अपधुप, पठारवाडी, गांजीभोयरे, शहांजापूर, मावळेवाडी, राळेगण थेरपाळ, पळसपूर, अस्तगाव, चिंचोली, म्हसोबा झाप, पळवे खू., पळवे बू.या पाणी पुरवठा योजनेसाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 60 कोटीचा निधी उपलब्ध झाला असल्याचे झावरे यांनी सांगितले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई थोरात, प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे पाटील, गणेश शेळके, सोन्याबापू भापकर, डॉ.भाऊसाहेब खिलारी, अरुणराव ठाणगे, सुनिल थोरात, किरण कोकाटे, सुभाषराव दूधाडे, अमोल मैड, लहू भालेकर, कैलास कोठुळे, बाळासाहेब रेपाळे, सतीश पिंपरकर, अमोल रासकर, शंकर महांडूळे, सुहास पुजारी, चंद्रकांत कुलकर्णी उपस्थितीत होते.

‘त्या’ गावांत होणार खासदार विखेंचा सत्कार
पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत तालुक्यातील गावांना जोडणार्‍या रस्त्यांची कोट्यवधी रुपयांची कामे खा. विखेंनी मार्गी लावली. ज्या गावांना रस्ते मिळाले, त्या गावांत खा. विखेंचा जाहीर सत्कार केला जाणार असल्याचे झावरे यांनी सागितले.

Back to top button