भगवान गडावर दसरा मेळाव्यास परवानगी द्या, पाथर्डी तहसीलदारांकडे कृती समितीची मागणी | पुढारी

भगवान गडावर दसरा मेळाव्यास परवानगी द्या, पाथर्डी तहसीलदारांकडे कृती समितीची मागणी

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : श्री. क्षेत्र भगवानगड येथे पारंपरिक दसरा मेळाव्यास परवानगी मिळावी, अशी मागणी े श्री. क्षेत्र भगवानगड पारंपारीक दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने सुनील पाखरे व राजेंद्र दगडखैर यांनी पाथर्डीचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वार केली आहे. या निमित्त पुन्हा एकदा भगवानगड आणि दसरा मेळावा हा विषय चर्चेचा ठरणार आहे. या परवानगीच्या पत्रावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

राष्ट्रसंत भगवान बाबांनी प्रारंभ केलेला दसरा मेळावा पारंपरिक जागेवर अखंड सुरू राहावा, यासाठीअसंख्य भक्त व भगवानगड दसरा मेळावा कृती समितीने दसरा मेळावा गडावर सकाळी 11 वाजता घेण्याचे ठरवले आहे. मेळाव्यास परवानगी द्यावी, असे पत्रात नमूद आहे. मेळाव्याला परवानगी देऊन आवश्यक सुविधा देण्याचे लेखी आदेश करून काढावेत. भगवान बाबांच्या भक्तांचा मानसन्मान राखत व पारंपरिक दसरा मेळाव्याची अखंड पार्श्वभूमी पाहता यंदा गडावर दसरा मेळाव्यास परवानगी देण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे. या मागणीने तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.

 

Back to top button