नगर : शिक्षक बँकेचा यंदा विक्रमी लाभांश जाहीर | पुढारी

नगर : शिक्षक बँकेचा यंदा विक्रमी लाभांश जाहीर

नगर : पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांना 10.10 टक्के इतका विक्रमी लाभांश वाटपाचा ठराव बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वात गुरुमाऊली मंडळाने एकमताने मंजूर करून घेतला. दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याने हा लाभांश आताच देता येणार की नाही, याविषयी मात्र बँक व्यवस्थापन संभ्रमात आहे. शिक्षक बँकेच्या सत्ताधारी संचालकांनी 10.10 टक्के इतका लाभांश वाटपाचा मोठा निर्णय घेतला आहे. कालच्या सर्वसाधारण सभेत या ठरावाला मंजुरीही मिळाली.

यापूर्वी 2019 मधील लाभांश सभासदांना मिळालेला नव्हता. तोही मिळावा, अशी सभासदांची अपेक्षा होती. मात्र त्याचा सभेत निर्णय होऊ शकला नाही. परंतु यावर्षीचा लाभांश चांगला मिळणार असल्याने सर्वांचे चेहरे खुलले आहेत. संस्थेचे अध्यक्ष किसनराव खेमनर यांनी याबाबत ठराव मांडला होता. तो विरोधी मंडळांनीही सर्वानुमते मंजूर केला आहे. त्यामुळे आता संस्थेच्या 10 हजारापेक्षा अधिक सभासदांना किमान 10 हजारांचा लाभांश मिळणार आहे. या निर्णयाचे सभासदांनीही स्वागत केले. दरम्यान, निवडणुका सुरू असल्याने लाभांश देता येणार की नाही, याविषयी संभ्रमावस्था आहे. मात्र सत्ताधारी गट लाभांश देण्यासाठी आग्रह आहे. यात विरोधी मंडळही ‘ना हरकत’ दाखवत आहे. त्यामुळे याबाबत सहकार विभाग नेमका काय निर्णय घेणार, याकडे लक्ष आहे.

Back to top button