नगर : बोगस बियाणे, खते विक्रेत्यांचा धुमाकूळ | पुढारी

नगर : बोगस बियाणे, खते विक्रेत्यांचा धुमाकूळ

पाथर्डी : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यासह तालुक्यात अनेक ठिकाणी बोगस बियाणे, औषधे व खते विक्रेत्यांचा बोलबाला असून, मागील वर्षी अनेक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा पडला होता. यामुळे कृषी विभागाने बोगस बियाणे, बनावट औषधे, खते विक्री करणार्‍यांना रोखण्यासाठी व्यावसायिकांना परवानगी न देता लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील क्रांती शेतकरी संघटनेचे सदस्य संदीप उगले व शेतकर्‍यांनी केली आहे.

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिंदेंच्या शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंचा दावा

सध्या खरीप हंगाम असल्याने बळीराजा मका, सोयाबीन, भुईमूग व इतर बियाणे दुकानातून विकत घेऊन पेरणी करीत आहे. मात्र, चार-पाच वषार्र्ंपासून अनेक ठिकाणी पेरणी झाल्यानंतर बियाणे उगवत नसल्याने हजारो रुपये व कष्ट वाया जात आहे. आता, विविध रासायनिक खते, औषधे, कीटकनाशकांच्याही अनेक प्रकारच्या बनावट कंपन्या बाजारात दाखल होवून शेतकर्‍यांची फसवणूक करू शकतात.

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

मागीलवर्षी कासार पिंपळगाव येथे शेतकरी सचिन घनवट यांनी परिसरातील एका दुकानदाराकडून सोयाबीन बियाणे घेऊन पेरणी केली होती. 15 दिवस होऊनही बियाण्यास कोंब न फुटल्याने पीक वाया गेले होते. त्यामुळे तालुका व पंचायत समितीतील कृषी विभाग अधिकारी, कर्मचार्‍यांनी परवानाधारक, अधिकृत दुकानदारांना बियाणे, औषधे, खते विक्रीची परवानगी देऊन बनावट घटक विक्री होणार नाहीत, याबाबत सूचना देण्याची मागणी क्रांती शेतकरी संघटनेतर्फे संदीप उगले, पंडितराव थिटे, रोहिदास जाधव, निवृत्ती खैरनार, राजेंद्र गांगुर्डे, हिरामण टकले, नंदलाल शेळके, शिवाजी पवार, सुनील जाधव, भास्कर राऊत व शेतकर्‍यांनी केली आहे.

 मी पळपुटा नाही म्हणत संजय राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर 

दोषींचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा

पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकरी मिळेल त्या दुकानातून बियाणे, खते, औषधे घेत असतो. परंतु, शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही, बियाणे व अन्य घटकांची वाजवीपेक्षा जास्त किंमत राहणार नाही, याबाबत कृषी विभागाने दक्ष रहावे. बनावट कंपनीद्वारे बोगस बियाणे, खते, औषधांची विक्री झाल्यास दुकानदाराचा कायमस्वरूपी परवाना रद्द करून गंभीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष भारतीय जनता पक्षात होणार विलीन

Back to top button