नगर : साहित्य खरेदीसाठी मनपा फायनान्सच्या दारात | पुढारी

नगर : साहित्य खरेदीसाठी मनपा फायनान्सच्या दारात

नगर : पुढारी वृत्तसेवा : सफाई मित्र अभियानांतर्गत चेंबर सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आता मशिनरी खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याच कामासाठी सफाई कामगारांना चेंबर व गटारीमध्ये उतरण्याची वेळ येणार नाही. मात्र, त्यासाठी एक कोटी 81 लाखांच्या निधीची आवश्यकता असून, मनपाने यावर्षी उपकरणे खरेदीसाठी अवघी 65 हजारांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे उर्वरित निधी नॅशनल कर्मचारी फायन्सस अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडून दोन टक्के व्याजाने स्वच्छता उद्यम योजनेंतर्गत मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे : शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आमच्याकडे, बहुमत चाचणीची चिंता नाही

सफाई कर्मचार्‍याचे होणार अपघात व दुर्घटना थांबविण्यासाठी केंद्र सरकारस्तरावर हालचाली सुरू आहेत. केंद्राच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजर अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत महपालिकेची भौगोलिक स्थिती, नदी, नाले, ओढे, गटारी आणि लोक संख्या याची माहिती मागविली होती. त्यानुसार मनपाने माहिती दिली आहे. तसेच, मनपाकडे गटारी, चेंबर साफ करण्यासाठी असलेल्या मशिनरीचीही माहिती मागविण्यात आली होती. ती माहितीही देण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या मैला उपसा मशिन आहेत. तसेच अन्य काही उपकरणे आहेत. मात्र, तरी सफाईसाठी कामगारांना चेंबरमध्ये उतरावे लागते. त्या कामगारांना चेंबरमध्ये उतरावे लागू नये यासाठी सफाई मित्र सुरक्षा अभियान सुरू आहेत.

मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश

दरम्यान, यावर्षी महापालिकेने घनकचरा विभागास मशिनरी खरेदीसाठी 65 लाखांच्या निधीची तरतुद केली आहे. मात्र, सफाई मित्र सुरक्षा अभियानांतर्गत मशिनरी खरेदीसाठी मनपाला 1 कोटी 89 लाख 30 हजार 57 रुपयांची गरज आहे. त्यात 65 लाखांचा निधी उपलब्ध आहे. उर्वरित एक कोटी 24 लाखांची अजूनही गरज आहे. मात्र, इतक्या निधीची तरतूद मनपाकडे नाही. त्यामुळे नॅशनल कर्मचारी फायनान्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या स्वच्छता उद्याम योजनेंकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.

गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

व्याजाने निधी घेणार

नॅशनल कर्मचारी फायनान्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन दोन टक्के व्याजाने पैसे देणार आहे. त्या पैशाचा हप्ता वेळेवर भरल्यास त्याला दोन टक्के रिबट भेटणार आहे. असा प्रस्ताव घनकचरा विभागाने तयार करून मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेत ठेवला जाणार आहे.

  • शहरात एकूण चेंबर – 54 हजार
  • चेंबर सफाई कर्मचारी – 38
  • प्रभाग समितीनिहाय कर्मचारी
  • प्रभाग समिती कार्यालय – 1 : 7
  • प्रभाग समिती कार्यालय – 2 : 13
  • प्रभाग समिती कार्यालय – 3 : 9
  • प्रभाग समिती कार्यालय – 4 : 9

व्हायरल व्हिडिओ! लग्‍नात पावसाची जोरदार एन्ट्री; तरीही पंगतीत वर्‍हाडींचा डोक्‍यावर खुर्ची घेत आडवा हात…

या साहित्याची मागणी

  • एयरलाईन ब्रीथींग अपार्टस – 2
  • गॅस मॉनिटर गॅसेस वॅनोसा – 3
  • ब्लोअर वीथ एअर कॉम्प्रेसर – 2
  • कॅमेरा अपार्टस – 2
  • पॉवर रोडिंग अपार्टस – 9
  • हायड्रोवॅक सेट – 1
  • व्हेहिकल फॉर एसडब्ल्यूएम – 1

सफाई मित्र सुरक्षा अभियानांतर्गत चेंबर कामगारांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून स्वच्छता उद्यम योजनेंतर्गत साहित्य खरेदीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

– किशोर देशमुख, घनकचरा व्यवस्थापक

Back to top button