

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्न म्हटले की, अक्षता पडायचा अवकाश कधी येकदा जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळतोय याकडेच बहुतांश लोकांचे लक्ष असते. काही ठिकाणी तर लग्नाच्या अक्षता पडण्याचीही वाट बघण्याची फुरसत नसणारे डायरेक्ट जेवणाचे टेबल खुर्ची पकडून बसतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका लग्नात जोरदार पावसाला सुरूवात झाली. मात्र तरीही जेवणावळीवर बसलेल्या पाहुणे मंडळींनी पावसातही जेवणासाठी जे केलं ते पाहता कोणालाही विश्वास बसणार नाही. या घटनेचा व्हिडिओ लोकांकडून पुन्हा-पुन्हा पाहिला जात आहे.
या व्हिडिओमध्ये लग्नात जोरदार पावसाला सुरूवात झाली असल्याचे दिसतंय. या भर पावसातही जेवणाच्या ताटावर बसलेली पाहुणे मंडळी पावसाची तमा न बाळगता स्वादीष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारत आहेत. पावसाच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी या पाहुण्यांनी डोक्यावर खुर्ची घेवून जेवायला सुरूवात केली आहे. पण काही झालं तरी जेवल्याशिवाय उठायचं नाही असा चंगच जणू त्यांनी बांधला आहे की काय असं दिसून येत आहे. अगदी हसत-हसत जेवताना त्यांचा हा व्हिडिओ मात्र भलताच व्हायरल झाला आहे. लोकांकडूनही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हे ही वाचा…