नगर : उद्घाटनापूर्वीच नूतन इमारतीला गेले तडे | पुढारी

नगर : उद्घाटनापूर्वीच नूतन इमारतीला गेले तडे

अकोले : राजेंद्र जाधव : अकोले तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या घाटघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारत ठेकेदार व जि. प. सा. बां. विभागाच्या गलथान कारभारामुळे सुमारे 1 कोटी 68 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या इमारतीला तडे जाण्या बरोबरच गळती लागल्याने नवीन इमारतीच्या कामाबाबत उद्घाटनापूर्वी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

सरकार स्थापनेसाठी भाजपकडून वेगाने हालचाली, फडणवीस दिल्लीला रवाना

अकोले तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागात आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असते. तसेच घाटघर येथे आरोग्य पथक असल्याने रुग्णांसाठी सुख-सुविधा उपलब्ध होण्याकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सन 2018 साली 1 कोटी 68 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे गुवाहाटीत पहिल्यांदाच मीडियासमोर, संपर्कातील आमदारांची नावे सांगा, ठाकरेंना दिले आव्हान

त्यामध्ये सुसज्ज इमारत, वैद्यकीय अधिकारी रुम, परिचारिका रुम, प्रसूतीगृह, ऑपरेशन रुम, औषधोपचार आदी सोई सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्या, तरी गेल्या 4 वर्षांपासून कासवगतीने इमारतीचे काम सुरू आहे. पण संबंधित ठेकेदाराने सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये काढले आहे, तर मागील वर्षी भर पावसात आ. डॉ. किरण लहामटे यांनी प्रत्यक्ष या नूतन आरोग्य केंद्राच्या इमारत कामाची संबंधित अधिकार्‍याच्या उपस्थितीत पाहणी करून दर्जात्मक काम करण्याची सूचना अधिकार्‍यांना केली होती. पण मात्र संबंधित अधिकारी व ठेकेदाराने लोकप्रतिनिधीच्या सूचनेला ठेंगा दाखविल्याचे दिसुन येते.

एकनाथ शिंदे समर्थक ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पत्रकारांच्या भेटीत कमतरता उघड

नुकतेच पत्रकारांनी घाटघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीला भेट दिली असता इमारतीच्या बांधकामाला तडे गेले, खिंडक्याच्या काचा फुटल्या, मेन गेटला गंज चढलेला, फरशा व बांधकामात सुसूत्रता नाही, पहिलाच पाऊस पडल्याने ठिकठिकाणी इमारत गळत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे, तसेच काही वर्षांपूर्वी या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असून मुदतीपूर्वी काम ठेकेदाराने पूर्ण करण्याचे बंधन असले, तरी मात्र अद्यापही बांधकाम पूर्णत्वाकडे गेलेले नाही. नूतन घाटकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम तत्काळ दर्जात्मक पूर्ण करण्यात येऊन रुग्णांना चांगल्या सोई सुविधा मिळाव्यात, यासाठी जि. प. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे.

Anand Mahindra qualification : आनंद महिंद्रांना नेटकर्‍याने विचारलं, तुमचं शिक्षण किती? ; उत्तराने सर्वांची मने जिंकली

काम लवकर करण्याची मागणी

अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणार्‍या आदिवासी अकोले तालुक्यातील घाटघरची लोकसंख्या 1 हजार 300 असल्याबरोबरच सभोवताली वाड्या-वस्त्यांवरील रुग्णांची सेवा घाटघर आरोग्य पथकावर अवलंबून आहे. इमारती अभावी आरोग्य पथकातील वैद्यकीय, अधिकारी व परिचारिका, कर्मचार्‍यांच्या गळक्या इमारतीत रुग्णांवर औषधे-उपचार करताना दिसत आहेत. त्यामुळे नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता असल्याने लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.

Back to top button