एकनाथ शिंदे समर्थक ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी | पुढारी

एकनाथ शिंदे समर्थक ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी रस्त्यावर उतरले आणि शिंदे यांच्यासोबत राहण्याचे जाहीर केले. त्याची किंमत ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के यांना मोजावी लागली. त्यांची शिवसेनेने पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून पक्षातून काढून टाकले. म्हस्के यांच्यासोबत शक्ती प्रदर्शन करण्यामध्ये ठाणे जिल्हा संघटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे ह्या आघाडीवर होत्या. महिला अध्यक्षा म्हणून त्यांनी शिवसेना मजबूत केले आहे. चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या मीनाक्षी शिंदे यांची आज पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची घोषणा शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

आज शिंदे यांनी ठाण्यातील सर्व महिलांना आनंद आश्रम येथे एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचे आवाहन केले होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत शिवसेनेच्या ३८ आमदारांनी महविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे नमूद केले आहे. यानंतर ठाण्यातील आनंद आश्रम येथे काल शिंदे सर्मथकांनी पुन्हा शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गटाची सेना हीच खरी सेना असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा केला होता.

 हे ही वाचा :

Back to top button