नगर : पीआय साहेब, आता तुम्हीच ‘प्रताप’ दाखवा | पुढारी

नगर : पीआय साहेब, आता तुम्हीच ‘प्रताप’ दाखवा

श्रीरामपूर : सागर मा. दोंदे : राहुरी तालुक्यात चोर्‍या, हाणामार्‍या, अपहरण, छेडछाड यांसारख्या गुन्ह्यांबरोबर खून, खुनी हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यात अल्पवयीन मुले, युवक आणि तरुणाईचा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे पीआय साहेब, वाढती गुन्हेगारी कशी रोखणार? तालुक्याला तुमचा ‘प्रताप’ केव्हा दाखविणार? ग्रामीण भागातील गुन्हेगारीचे पेव कधी संपुष्टात येणार, असा प्रश्न जनसामान्यांतून विचारला जात आहे.

सरकार स्थापनेसाठी भाजपकडून वेगाने हालचाली, फडणवीस दिल्लीला रवाना

राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. दररोज तालुक्यात एक ना अनेक गुन्हेगारीच्या घटनेची नोंद ‘क्राईम डायरी’ला होत आहे. वेगवेगळ्या कारणास्तव केलेले गुन्हे हे काही केल्याने कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस अपहरण, चोर्‍या, दरोडे, बलात्कार, हाणामार्‍या, खून, सावकारी, अवैध धंदे अशा घटना गती घेत आहे. यामध्ये नवतरुणाई सहभागी असल्याचे निदर्शनास येत आहे. आता, शहराबरोबर ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे पेव फुटले आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. या सर्व प्रकाराला पोलिसांची कार्यक्षमता कमी पडत असल्याची नागरिकांत जोरदार चर्चा सुरू आहे.

एकनाथ शिंदे गुवाहाटीत पहिल्यांदाच मीडियासमोर, संपर्कातील आमदारांची नावे सांगा, ठाकरेंना दिले आव्हान

टवाळखोरांचा वाढता त्रास

गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी म्हैसगावातील काही टवाळखोर तरुणांनी एका आदिवासी तरुणाला निर्दयी स्थळी नेऊन बेदम मारहाण केली. जीवाच्या आकांतांनी ओरडत असलेला जखमी तरुण वेदनेने व्याकूळ झाला होता. त्यावेळी त्याच्या आवाजाने काही तरुण मदतीला धावून आल्याने टवाळखोर तणांच्या तावडीतून त्याची सुटका झाली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करून औषधोपचार केले. त्यानंतर त्याला सुखरुप घरी सोडण्यात आले. मात्र, आपण आदिवासी तरुणाला मारहाण केल्याने याचे विपरीत परिणाम होईल. या भीतीपोटी टवाळखोर तरुणांनी पोलिस ठाणे गाठून जखमी तरुणांविरोधातच गुन्हा दाखल केला. त्यादरम्यान पोलिस ठाण्यातून जखमी आदिवासी तरुणाच्या नातेवाईकांना पोलिस कर्मचार्‍यांनी संपर्क करून ठाण्यात बोलविले. त्यानंतर त्याचा जबाब नोंदवून त्याला औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, आदिवासी तरुणाला जबर मारहाण होऊनही 323, 504, 506 प्रमाणे कलमे लावण्यात आली. आजही जखमी तरुण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही : दीपक केसरकर

आदिवासी तरुणाचे प्रकरण मिटविण्यासाठी ‘हवेली’ कडून हालचाली सुरू असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. पोलिस प्रशासनावर दबावतंत्र वापरून या प्रकरणाला मुठमाती देण्याचाही प्रकार सुरू आहे. मात्र, वेळीच गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही, तर भविष्यातील गुन्हेगारी आणखी भयावह होवू शकते. त्यावेळी ग्रामीण भागाचाही ‘बिहार’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पीआय साहेब, आतातरी गुन्हेगारी रोखण्यासाठी तुमचा ‘प्रताप’ दाखवा, अन्यथा तत्कालीन पोलिस अधिकार्‍यांप्रमाणेच आपल्यावरही ‘शिक्का’ बसेल यात मात्र शंका नाही.

शिवसेना कमकुवत करण्याचे सहयोगी पक्षांचे कारस्थान : आमदार उदय सामंत

खमका पोलिस अधिकारी मिळाला

गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्याला खमक्या पोलिस अधिकारी मिळालाच नाही. तत्कालीन पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे वगळता पो. नि. राजेंद्र इंगळे, पो. नि. मुकुंद देशमुख, पो. नि. नंदकुमार दुधाळ यांसारखे अधिकारी वादग्रस्त भूमिकेमुळे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. त्यात विद्यमान पोलिस निरीक्षकांची ‘डॅशिंग’ अधिकारी म्हणून तालुकाभर चर्चा झाली. मात्र, तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्याबाबत अपयशी ठरले असल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्र्यांची तयारी

तरुणाईला गुन्हेगारीासून मागे खेचणे गरजेचे

करिअरच्या उंबरठ्यावर असताना गुन्हेगारीकडे वळणार्‍या तरुणाईला मागे खेचण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यातील गुन्हेगारी आणखी भयावह असू शकते. तालुक्यातील तरुणांमधील गुन्हेगारीचे आकर्षण कमी झाले नाही. हे समाज व्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल. अशा तरुणांना नकारात्मक गोष्टींचे खतपाणी मिळत असल्यानेच ते सहजपणे गुन्हे घडवत असतात.

Back to top button