नगर : जय गणेश कॉलनीत ‘अंधार’ | पुढारी

नगर : जय गणेश कॉलनीत ‘अंधार’

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या केडगाव हद्दीत अरणगाव रस्त्यावरील जय गणेश कॉलनीत गेल्या तीन वर्षांपासून मनपाच्या पथदिव्यांचा प्रकाश पडला नाही. मनपाने खांबावर एलईडी लटकविले आहेत. वीजजोडअभावी ते बंद आहेत. त्यामुळे सव्वाशे घरांची कॉलनी अंधारात आहे.

जय गणेश कॉलनीमध्ये शंभर ते सव्वाशे घरांची लोकवस्ती असून, महापालिका हद्दीच्या सीमेवर ही कॉलनी आहे. ओढ्याच्या पूर्वीकडील बाजू बुरुडगावमध्ये जाते, तर पश्चिमेकडील बाजू केडगाव हद्दीत येते. या भागात असलेली डिपी ग्रामीणची असल्याने महावितरण महापालिकेला पथदिव्यांसाठी कनेक्शन जोडू देत नाही.

अजय चौधरी हेच शिवसेनेचे गटनेते; विधानसभा उपाध्यक्षांनी शिंदे गटाचे नियुक्ती पत्र फेटाळले

महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकही नागरिकांच्या या अनेक वर्षांच्या रखडलेल्या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. रात्रीच्या वेळी नागरिकांना टॉर्च घेऊनच बाहेर पडावे लागत आहे. पथदिवे नसल्याने घरफोड्या, चोर्‍या, लुटमारीचे अनेक प्रकार घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कॉलनीतील भाऊसाहेब देशमुख, मच्छिंद्र वाव्हळ, अमोल नलगे, टी. एम. वाघमारे, निवृत्ती घोडके, रामदास वाल्हेकर, सुभाष ठुबे, जयवंत पिंपळे, सागर काळे, राहुल कांकरिया, आकाश ठोंबरे, योगेंद्र कासार, अरुणा नलगे, संगीता नलगे, मंगल काळे, संजीवनी देशमुख, लता वाघमारे, छाया ठुबे, प्रतिभा कासार, डॉ. पानसरे, मनीषा गायकवाड, सोनाली गोरे, अरविंद घोडके, भरत गोरे, शेख, परदेशी, नरेंद्र दातीर आदी नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Back to top button