सावधान! राज्यात उष्णतेची लाट तीव्र; ‘या’ भागात पावसाचा अंदाज | पुढारी

सावधान! राज्यात उष्णतेची लाट तीव्र; 'या' भागात पावसाचा अंदाज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मागील आठ ते दहा दिवसांपासून दुपारपर्यंत तीव्र उष्णतेची लाट आणि दुपारनंतर तीव्र वळीव पावसाची जोरदार हजेरी, असे वातावरण सध्या राज्यात सुरू असून, रविवारपर्यंत अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला असून, भुसावळ शहरात उच्चांकी 47.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. जळगावला 45.3 अंश, तर नाशिकला 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

संपूर्ण उत्तर महाराष्ट्र उष्णतेच्या झळांनी भाजून निघाला आहे. पुढील चार दिवस पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर या भागांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना तीव्र उष्ण व दमट वातावरणाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, बुलडाणा, नागपूर,

वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना रविवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार आहेत. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, अकोला या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई 35, सांताक्रूझ 35, रत्नागिरी 32.8, डहाणू 40.6, लोहगाव 40, नगर 41, जळगाव 45.2, कोल्हापूर 36.2, महाबळेश्वर 30.9, मालेगाव 43, नाशिक 41.8, सांगली 36.4, सातारा 38.3, सोलापूर 41.8, संभाजीनगर 41.6, परभणी 41.7, नांदेड 40.8, बीड 43.3, अकोला 44, अमरावती 43.2, ब्रह्मपुरी 43.3, चंद्रपूर 42.8, गोंदिया 39.6, नागपूर 40.7, वर्धा 43.1, यवतमाळ 42.

हेही वाचा

Back to top button