नागपूरकरांचा विरोध, स्मार्ट मीटर योजना तूर्त रद्द ! | पुढारी

नागपूरकरांचा विरोध, स्मार्ट मीटर योजना तूर्त रद्द !

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विदर्भामध्ये स्मार्ट मीटर योजनेला कडाडून विरोध झाला. दरम्यान उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात नागपुरात झालेला तीव्र विरोध करण्यात आला. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारकडून घरोघरी ‘स्मार्ट मीटर’ लावण्याची योजना रद्द करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस यांनी मुंबईत शुक्रवारी (दि.15) भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत चर्चा केली आणि सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केले. या बाबतची अधिक माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली.

आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी लावले जातील. अदानी पॉवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, मॉन्टेकालों या चार कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. साधारण आठवड्याभरात नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. परंतु, आता फडणवीस यांनीच सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत असे स्पष्ट केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

Back to top button