धुळे लोकसभा 2024 : चौथ्या दिवशी सहा उमेदवारांनी दाखल केले सहा नामनिर्देशन पत्र | पुढारी

धुळे लोकसभा 2024 : चौथ्या दिवशी सहा उमेदवारांनी दाखल केले सहा नामनिर्देशन पत्र

धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी (दि.२) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी उमेदवारांनी हजेरी लावली. यामध्ये सहा नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या गुरुवारी (दि.२) चौथ्या दिवशी भरत बाबुराव जाधव, अपक्ष यांनी एक अर्ज, पाटील शिवाजी नथ्थु, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष यांनी एक अर्ज, शेख मोहम्मद जैद शमीम अहमद, वेल्फेअर पार्टी ऑॅफ इंडिया पक्ष यांनी एक, मुकिमुद्दीन शेख, भीमसेना यांनी एक अर्ज, सुरेश जगन्नाथ ब्राम्हणकर अपक्ष यांनी एक अर्ज तसेच संजय रामेश्वर शर्मा अपक्ष यांनी एक अर्ज असे एकूण सहा उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले आहे. तसेच ८ उमेदवारांनी १३ नामनिर्देशन पत्र खरेदी केल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी गोयल यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button