UPSC Success Farmers Son Story: निळवंडीत विनय पाटील यांचा सत्कार अन् भव्य मिरवणूक | पुढारी

UPSC Success Farmers Son Story: निळवंडीत विनय पाटील यांचा सत्कार अन् भव्य मिरवणूक

नाशिक (जानोरी) पुढारी वृत्तसेवा :
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या युपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत यशवंतामध्ये महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील यशवंताना मिळालेले यशापैकी एक नाशिकमधील शेतकरी पूत्र विनय पाटील यांचा समावेश आहे.

नाशिकच्या शेतकरी पुत्राने अखेर यशाला गवसणी घातली आहे. आई-वडील शेतकरी आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या विनय पाटीलने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे निळवंडीभागात ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ करण्यात येऊन गावातील लहानग्यांनी लेझीम पथकाच्या तालावर आपल्या परीने यशाचे कौतुक केले आहे. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ, सरपंच, सदस्यांनी विनय पाटील याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

शेतकरी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील विनय पाटीलचे आई-वडील दोघेही शेतकरी आहेत. विनय पाटीलने आपले चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले. यानंतर पुढील शिक्षण हे जनता इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले. आई-वडील दोघेही शेती करत असतांना खडतर परिस्थितीत अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत विनयने एक-एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली. विनयने केटीएचएम महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी आणि त्यानंतर बी. एस्सी कृषीमधून शिक्षण पूर्ण केले. यानंतर विनयने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचं ठरवले आणि दिल्ली गाठली. यानंतर विनयने तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. यूपीएससीच्या अंतिम परीक्षेत विनयने १२२ वा क्रमांक पटकावला आहे.

हेही वाचा:

Back to top button