नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत नाशिकच्या ७ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील शेतकऱ्याचा मुलगा विनय सुनील पाटील याने १२२ वा क्रमांक मिळवत आपले आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांची कन्या जान्हवी शेखर हिने १४५ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले.
नाशिकचे उत्सव प्रशांत राका याने यूपीएससी परीक्षेत २७० वा क्रमांक मिळवत यश कमवले. येवल्यातील पोलिस जमादाराची नात असलेल्या प्रियंका सुरेश मोहिते हिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी देशपातळीवरील रँकिंगमध्ये ५९५ वा क्रमांक मिळवत यशाला गवसणी घातली. निफाड तालुक्यातील शिक्षकाचा मुलगा आविष्कार विजयकुमार डर्ले याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ६०४ व्या क्रमांकावर उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.
सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील सूरज प्रभाकर निकम याने देशपातळीवरील रॅंकिंगमध्ये ७०६वा क्रमांक मिळवत यश कमवले. सटाणा तालुक्यातील वनोली येथील शेतकरीपुत्र सागर संजय भामरे याने ५२३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत यश मिळवले. ओझर येथील कुणाल अहिरराव याने देशपातळीवर ७३२ वा क्रमांक मिळवत यश मिळवले.
हेही वाचा: