

जानोरी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील शेतकरी पुत्राने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील शेतकऱ्याचा मुलगा विनय सुनील पाटील यांनी युपीएससी परीक्षेत तिसऱ्याच प्रयत्नात 122 वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला.
दिंडोरी शहरानजीक असलेल्या निळवंडी येथील सुनील पाटील यांचा मुलगा विनय हा बी एसी एग्री झाला असून तो गेल्या तीन वर्षापासून यु पी एस सी परीक्षेची तयारी करत होता. घरूनच अभ्यास करत ऑनलाईन क्लासची मदत घेत विनयने हे यश मिळवले आहे. विनयने तिसऱ्याच प्रयत्नात हे यश मिळवले असून पहिल्यापासून त्याचे आयएएस अधिकारी व्हायचं असं स्वप्न होतं.
हेही वाचा :