Weather Forecast : राज्‍यातील ‘या’ जिल्ह्यांना उद्या ‘रेड’ अलर्ट | पुढारी

Weather Forecast : राज्‍यातील 'या' जिल्ह्यांना उद्या 'रेड' अलर्ट

पुढारी ऑनलाईन : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. पालघर, रायगड या जिल्ह्यांना देखील यापूर्वी रेड अलर्ट देण्यात आला होता. दरम्‍यान, आज दुपारच्या बुलेटिनमध्ये भारतीय हवामान विभाग मुंबईने दिलेल्या माहितीनुसार पालघर, रायगडसह अनेक जिल्ह्यांना  रेड अलर्ट (Weather Forecast) जारी करण्यात आला आहे. शुक्रवार, २१ जुलै राेजीही  पश्चिम घाटमाथ्यावरील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती IMD मुंबईने ट्विटरवरून दिली आहे.

‘आयएमडी’ मुंबईने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आज (२० जुलै) पालघर, ठाणे, रायगड, पुणे या जिल्ह्यांना तर उद्या (२१ जुलै) पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्टचा अंदाज आहे. दरम्यान, २४ जुलैपर्यंत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Weather Forecast) जारी करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

Weather Forecast : राज्यात 25 जुलैपर्यंत बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, घाटमाथा या भागांत 25 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार, तर मराठवाड्याच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थिती, तसेच आगामी 24 तासांत मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे पुढील पाच दिवस राज्याच्या सर्वच भागांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपि यांनी दिली.

हेही वाचा:

Back to top button